esakal | आधारकार्ड असेल तरच "या' राज्यात प्रवेश... 
sakal

बोलून बातमी शोधा

 Aadhaar card, you can enter this Karnataka

महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांची शिनोळी (जि. कोल्हापूर) येथे कसून चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र हद्दीतून जर कर्नाटकात प्रवेश हवा असल्यास आधार कार्ड दाखवूनच प्रवेश देण्याचा नियम कर्नाटक शासनाकडून लावला गेला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता कुद्रेमानीतील लोकांना जर बेळगावला यायचे असल्या

आधारकार्ड असेल तरच "या' राज्यात प्रवेश... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगावः महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांची शिनोळी (जि. कोल्हापूर) येथे कसून चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र हद्दीतून जर कर्नाटकात प्रवेश हवा असल्यास आधार कार्ड दाखवूनच प्रवेश देण्याचा नियम कर्नाटक शासनाकडून लावला गेला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता कुद्रेमानीतील लोकांना जर बेळगावला यायचे असल्यास बाची येथे कर्नाटक पोलिसांना आधार कार्ड दाखवूनच प्रवेश मिळवावा लागत आहे. 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कर्नाटक शासनाने गंभीर पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्रातून येणारे सीमाभागातील सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. बेळगाव-वेंगुला हा राज्य मार्गही बंद करण्यात आला होता, या मार्गावरील सर्व वाहनांना निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या निर्बंधामुळे कर्नाटकातील कुद्रेमानी गावातील नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागला. कुद्रेमानीतील नागरिकांना बेळगावला उपचार घेण्यासाठीही मोठी अडचण निर्माण झाल्याने गर्भवती महिलांना याचा अधिक त्रास झाला आहे. यामुळे अनेक संघटनानी आणि लोकप्रतिनिंधीनी वेंगुर्ला मार्गावरील अत्यावश्‍यक सेवेसाठी वाहतुक खुली करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांवर केली. त्याचबरोबर कुद्रेमानीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मार्ग खुला करण्याची मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. यानंतर बेळगाव जिल्हा प्रशासनाने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मोबाईलद्वारे चर्चा करुन व पत्रव्यवहारानंतर वेंगुर्ला मार्ग खुला करण्यात आला आहे मात्र, अत्यावश्‍यक सेवेसाठी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. 

सध्या बाची येथे कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची व वाहनांची कसून चौकशी केली जात असून कुद्रेमानीतीलही नागरिकांकडूनही आधार कार्डची चौकशी केली जात आहे. ज्याच्याकडे कर्नाटकाचे आधारकार्ड आहे, त्या व्यक्तीला कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली आहे. 

वाहनांची कसून तपासणी

अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी मार्ग खुला करण्यात आला असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कर्नाटकातील व्यक्‍तीला प्रवेश दिला जात आहे, मात्र संबंधित व्यक्‍तीकडे रहिवाशी दाखला व आधार कार्ड असल्यास प्रवेशास मुभा असल्याची माहिती बेळगाव ग्रामीणच्या पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर यांनी सांगितले.  
 

loading image