‘आधार’ ते विमानतळ केवळ सहा मिनिटांत...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

कोल्हापूर - आधार हॉस्पिटल ते विमानतळ हे अंतर साधारण आठ किलोमीटरचे व एरवीच्या प्रवासात पंधरा ते वीस मिनिटे अंतराचे. पण, आज अवयव प्रत्यारोपणासाठी राबविलेल्या ग्रीन कॉरिडॉरमुळे हृदय घेऊन जाणारी रुग्णवाहिका अवघ्या सहा मिनिटांत विमानतळावर पोचली. आणि विमानानेही लगेच मुंबईच्या दिशेने झेप घेतली. या घटनेच्या निमित्ताने काही आणीबाणीच्या क्षणीही वाहतूक यंत्रणा किती तत्परतेने हाताळता येऊ शकते, याची रंगीत तालीमच घडली.

बरोबर चार वाजून दहा मिनिटांनी खास कप्पीत बंद केलेले हृदय घेऊन रुग्णवाहिका विमानतळाकडे निघाली. पुढे शहर वाहतूक शाखेची गाडी सायरन वाजवत होती. त्यात पोलिस निरीक्षक बाजीराव सूर्यवंशी व त्यांचे सहकारी होते. मार्गात ठिकठिकाणी व संलग्न मार्गावर पोलिस उभे होते. रुग्णवाहिका येत असल्याची सूचना मिळताच वाहने थांबविली जात होती. व त्यामुळे रुग्णवाहिकेचा वेग किंचितही कमी न होता ती पुढे जात होती. चार वाजून सोळा मिनिटांनी ही रुग्णवाहिका विमानतळावर पोचली. व थेट खास मार्गाने विमानाजवळ जाऊन थांबली. डॉक्‍टर, वैद्यकीय तंत्रज्ञांनी पुन्हा सर्व खातरजमा करून घेतल्यानंतर विमान मुंबईच्या दिशेने झेपावले. 

पुण्याच्या दिशेने याच पद्धतीने यकृत, मूत्रपिंड घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णवाहिका निघाली. एक रुग्णवाहिका सोलापूरला मूत्रपिंड घेऊन जाणार होती. पण, ऐनवेळी ती पुण्यातील रुग्णालयाकडे नेण्याचा निर्णय झाला. फौजदार दिलीप ढेरे, अंजना फाळके यांनी कोल्हापूर हद्द संपेपर्यंत ही रुग्णवाहिका पंधरा मिनिटांत पोचवली. तेथून सांगली पोलिसांनी ती साताऱ्यापर्यंत व सातारा पोलिसांनी पुण्यापर्यंत पोचविली.

Web Title: aadhar hospital to airport amar patil heart