कर्जमुक्तीचा गोंधळ मिटवू - आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

'राज्यातील शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती झाली पाहिजे. माफी गुन्हेगारांना दिली जाते. शेतकरी गुन्हेगार नाहीत. आज कर्जमुक्ती होत असली, तरी अनेक ठिकाणी गोंधळ आहे. काहींना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले; परंतु बॅंकेत पैसे जमा झाले नाहीत. तसे झाले असेल, तर शिवसैनिकांना सांगा. ते तुम्हाला न्याय देतील,'' अशी ग्वाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.

श्रीरामपूर - 'राज्यातील शेतकऱ्यांना विसरून चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती झाली पाहिजे. माफी गुन्हेगारांना दिली जाते. शेतकरी गुन्हेगार नाहीत. आज कर्जमुक्ती होत असली, तरी अनेक ठिकाणी गोंधळ आहे. काहींना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले; परंतु बॅंकेत पैसे जमा झाले नाहीत. तसे झाले असेल, तर शिवसैनिकांना सांगा. ते तुम्हाला न्याय देतील,'' अशी ग्वाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त येथील आझाद मैदानासमोर आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, 'सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. शेतकरी आणि शिवसेना वेगळी नाही. आपले रक्त एकच आहे. ही यात्रा मत मागण्यासाठी किंवा आगामी निवडणुकीसाठीही नाही; तर तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी व दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. सरकारसमोर आज अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ, विजेची कमतरता, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे कर्ज यांसारखे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaditya Thackeray Talking on Debt Relief Confusion