आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून अडचण नसून खोळंबा !

water-project
water-project

आधळगाव - मंगळवेढा तालुक्यात 10 गावांना नळ पाणीपुरवठा करणारी आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नियोजना अभावी बंद पडली आहे. ही योजना ज्या गावांना आहे, त्या गावांना इतर दूसरी कोणती योजनाही राबविता येत नसल्याने या योजनेखाली असलेली गावे उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडत असतात. मात्र ही योजना चालविणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वर्षभर झोपेचे सोंग घेवून शांत असतो त्यामुळे ही योजना असून अडचण नसून खोळंबा झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आ प्रशांत परिचारक यांनी जिल्हाधिकारी समवेत बैठक घेतली असली पण ही योजना कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले.

तालुक्यातील आंधळगाव, लक्ष्मीदहिवडी, महमदाबाद(शे), अकोला, कचरेवाडी, शरदनगर, देगाव, मारापुर, घरनिंकी, धर्मगाव या गावांना पिण्याचे शुद्ध पानी मिळावे म्हणून तत्कालीन आमदार लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही योजना मंजूर केली आणि राम साळे यांच्या काळात या योजनेचे काम पूर्ण झाले होते मात्र काम पूर्ण झाल्यानंतर ही योजना शिखर समीती स्थापन करून जिल्हा परिषदेला चलविन्यास देणे गरजेचे होते मात्र जीवन प्राधिकरणलाच ही योजना नियमित चालवता आली नसल्याने शिखर समितीने ही योजना चालवण्यास विरोध केला. मागील टंचाई काळात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यानी टंचाई मधून ही योजना दुरुस्ती साठी निधि मिळवून दिला होता तरीही ही योजना व्यवस्थित चालली नसल्याने सध्या दुरुस्ती अभावी योजना बंदच आहे.

आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही राज्य शासनाने 7 मे 2016 ला परिपत्रक काढून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडेच राहणार असल्याचे सुचवन्यात आले होते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यभर 2016-17 ते 2019-20 या चार वर्षासाठी राबवन्यात येत आहे या योजनेचा उद्देश राज्यातील ग्रामीण जनतेला शुध्द आणि पुरेशे पानी उपलब्ध करून देणे असा होता.

राष्ट्रिय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या धर्तीवर राबवन्यात येत असलेला मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम हा राज्यातील सर्व भागात लागू आहे. या योजनेचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून नविन योजना हाती घेणे, राष्ट्रिय पेयजल अंतर्गत च्या योजनाचे पुनुरूज्जीवन करने आणि प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करणे असे होते. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चूनजनतेच्या सेवेसाठी राबविलेली हीयोजना नियोजना अभावी दुरुस्ती अभावी बंद आहे. ही योजना शासनाने राबविली खरी मात्र प्रशासनाने जागरूकता न ठेवल्यामुळे हि योजना अल्पावधीतच बंद पडली. दुष्काळ संपला की अधिकारी या योजनेकडे फिरकत ही नाहीत त्यामुळे या योजनांची आठवण जनतेला व अधिकाऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवू लागल्यावरच येते.

कोट्यवधी रुपये खर्चून उभी केलेली ही योजना नियोजनाअभावी धूळ खात पडून आहे. ही योजना सुरू झाल्यापासून चालवण्यास प्रशासन निरुत्साही असल्याने योजनेखालील गावांना टंचाई काळात तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com