32 वर्षीय अपंग विक्रम चव्हाण करत आहेत बावीस वर्षे वारी

राजकुमार शहा 
मंगळवार, 24 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) - पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी शरीराने धडधाकट असणारे काहीही करून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतातच पण कंबरेपासून अपंग असणारे व हातावर सरपटून अंतर पार करणारे तुळजापूर येथील 32 वर्षीय विक्रम प्रल्हाद चव्हाण हे वयाच्या दहाव्या वर्षापासून न चुकता पंढरीची वारी करतात त्यांचा हा विक्रम गेल्या बावीस वर्षांपासून सुरू आहे. 

चंद्रभागेच्या वाळवंटात प्रत्येकाच्या तोंडी चव्हाण यांचीच चर्चा आहे. चव्हाण यांना दोन्ही पाय आहेत पण ते वाकडे झालेले. त्यामुळे त्यांना चालता येत नाही. एका हाताने टाळ वाजवीत व एका हाताच्या आधारावर जमिनीवरून सरपटत ते तुळजापूर ते पंढरपूर हे सुमारे सव्वाशे किमीचा प्रवास करून पंढरीच्या वारीसाठी येतात. डोक्यावर टोपी व उघड्या शरिरावर पांडुरंगाचे चित्र असे त्यांचे आजचे चित्र होते. त्यांना पाहता क्षणी जो तो आपल्या परिने चव्हाण यांना आर्थिक मदत करीत होता.

Web Title: aashadhi ekadashi wari palkhi handicapped vikram chavan