दोन मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

आश्‍वी (जि. नगर) - पोखरी बाळेश्‍वर (संगमनेर) येथे दोन अल्पवयीन मुलांची गळा दाबून हत्या करून त्यांच्या पित्याने आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. अशोक संतू फटांगरे (वय 35), अस्मिता (वय 12) व प्रफुल्ल (वय 7) अशी मृतांची नावे आहेत.

पोखरी बाळेश्वर शिवारातील शेतातील वस्तीवर फटांगरे हे पत्नी, मुलगा व मुलीसह राहत होते. त्यांची पत्नी बुधवारी (ता.7) माहेरी गेली होती. घरात अशोक व दोन्ही मुले होती. त्यांनी रात्री मुलगी अस्मिता व मुलगा प्रफुल्लची गळा दाबून हत्या केली. नंतर घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

संतू देवजी फटांगरे यांनी आज सकाळी घारगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणारा अशोक काही वर्षांपासून मणक्‍याच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अस्मिता सहावीत आणि प्रफुल्ल दुसरीत शिकत होता.

Web Title: aashvi nagar news murder & suicide