बसस्थानक रोडरोमिओंच्या विळख्यात

नागेश गायकवाड
शनिवार, 16 जून 2018

आटपाडी - येथील बसस्थानक रोडरोमिओंच्या विळख्यात तर वर्कशाप विभागच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. चालक आणी वाहकांची कमतरता असल्याने बसफेऱ्या कमी कराव्या लागतात. पूर्वीच्या तुलनेत खासगी प्रवासी वाहतूक खूपच कमी  असतानाही बस फेऱ्यांत २५ टक्के कपात केली आहे. 

आटपाडी - येथील बसस्थानक रोडरोमिओंच्या विळख्यात तर वर्कशाप विभागच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. चालक आणी वाहकांची कमतरता असल्याने बसफेऱ्या कमी कराव्या लागतात. पूर्वीच्या तुलनेत खासगी प्रवासी वाहतूक खूपच कमी  असतानाही बस फेऱ्यांत २५ टक्के कपात केली आहे. 

सध्या ६३ बसेस आहेत. यापूर्वी १०० ते ११० फेऱ्या होत. सुटीमुळे कमी केल्या आहेत. वर्कशाप विभागात ५४ मंजूरपैकी ३८ कामगार आहेत. १६ कामगारांचा कामाचा लोड ३८ कर्मचाऱ्यांवर पडतो. विद्यार्थी पासची सोय बसस्थानकावर असताना संबंधित अधिकारी तेथे न बसता आगारात बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहीसाठी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. दररोज सरासरी अडीच हजार विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळेच सकाळी बसस्थानकाला रोडरोमिओंचा विळखा असतो. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.

वर्कशॉप विभागात सुविधांच्या नावे तीन तेरा वाजलेत. कामगारांना शुद्ध पाणी मिळत नाही. पाण्याचा टॅंकर दोन महिने दुरुस्तीसाठी गेलेला  अजून परतलाच नाही. वर्कशाप विभाग ढकलस्टार्टमुळे कसाबसा सुरू आहे.

एक दृष्टिक्षेप 
 बसेस : ६३ 
 चालक : १११,  वाहक :१०४ 
 वर्कशॉप कर्मचारी : ३८    मंजूर : ५४
 उलाढाल प्रतिदिन - ६.५० लाख
 महिन्याचे उत्पन्न  - सव्वादोन कोटी 
 विद्यार्थीसंख्या : २५००

नियोजन करून प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे- 
- सदाशिव कदम, आगार व्यवस्थापक, आटपाडी

वर्कशाप विभागात सुविधा नाहीत. शुद्ध पाणी आणि वीज नाही. आंदोलन करणार आहे.
- एम. एम. चपने, कामगार संघटना तालुकाध्यक्ष

(उद्याच्या अंकात जत बसस्थानक)

Web Title: aatpadi bus stop road romio