सांगली ग्रामीण ठाण्यात उद्या बेवारस वाहनांचा लिलाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

सांगली - येथील सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त असलेल्या आणि बेवारस वाहनांचा लिलाव सोमवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली.
ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यातील जप्त वाहने अनेक वर्षापासून ऊन, वारा, पाऊस यामुळे गंजून चालली आहेत. या वाहनांचे अवमूल्यन होत चालले आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून १३ वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्याची मंजुरी घेतली. तसेच मिरजेचे तहसीलदार यांनी २१ वाहनांची लिलाव करून विक्री करण्याची मंजुरी दिली.

त्यामुळे पोलिस ठाण्यात जप्त असलेल्या आणि बेवारस मिळून ३४ वाहनांचा लिलाव करून रक्कम चलनाने भरणा करण्यास मंजुरी घेण्यात आली आहे.
सांगली ग्रामीण पोलिस ठाणे आवारात १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लिलावाची प्रक्रिया सुरू होईल. ज्यांच्याकडे खरेदी-विक्रीचा परवाना आहे अशांनी लिलावात सहभागी होण्यासाठी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन निरीक्षक गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: abandoned vehical auction