इचलकरंजीचे संस्थानिक आबासाहेब घोरपडे यांचे पुणे येथे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

इचलकरंजी - येथील संस्थानिक आबासाहेब नारायण घोरपडे (वय ८६ ) यांचे आज पुणे येथे निधन झाले. इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांचे ते चिरंजीव होत.

इचलकरंजी - येथील संस्थानिक आबासाहेब नारायण घोरपडे (वय ८६ ) यांचे आज पुणे येथे निधन झाले. इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांचे ते चिरंजीव होत.

नारायण बाबासाहेब घोरपडे यांनी इचलकरंजीच्या शैक्षणिक, औद्योगिक यासह शहराच्या विकासाला मोठे योगदान दिले होते. त्यांचा वारसा पुढे चालविताना आबासाहेब यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात मोठे योगदान दिले. संस्थानिकांचा भव्य राजवाडा अन्य वापरासाठी न होता तो शैक्षणिक कार्यासाठी व्हावा यासाठी त्यांनी १९८३ च्या सुमारास शहरातील भव्य राजवाडा डी. के. टी. इ संस्थेला दिला. त्याच बरोबर अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी अखेरपर्यन्त  मदत केली.  

गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. त्यांची आज पहाटे पुणे येथे प्राणज्योत मालवली. आज विविध संस्थांनी शाळा बंद ठेऊन आदरांजली वाहिली.

Web Title: Abasaheb Ghorpade passed away at Pune