अभिजित बिचुकलेच्या खंडणीप्रकरणी सुनावणी सुरू

abhijit-bichukale
abhijit-bichukale

सातारा - न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या अभिजित बिचुकले यास आज खंडणीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सातारा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एका साक्षीदाराची साक्ष नोंदवली असून, पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. 

साताऱ्यातील अभिजित बिचुकले हा बिग बॉस सिझन दोनमध्ये सहभागी झाला होता. याच कालावधीत एका धनादेश न वठल्याच्या प्रकरणात बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटनुसार सातारा पोलिसांनी त्याला मुंबई येथून ताब्यात घेतले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. जामिनाची प्रक्रिया सुरू असतानाच सातारा पोलिसांनी २०१२ मध्ये दाखल असणाऱ्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी बिचुकलेचा ताबा मिळण्याची परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात केला. बिचुकलेच्या वतीने खंडणीच्या गुन्ह्यात जामिनासाठीचा अर्ज करण्यात आला. तो फेटाळत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com