एसटी चालक-वाहकांसाठी एसी रेस्टरुम (व्हिडिओ)

एसटी चालक-वाहकांसाठी एसी रेस्टरुम
एसटी चालक-वाहकांसाठी एसी रेस्टरुम

कऱ्हाडला वडिलांच्या स्मरणार्थ अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदेंचा उपक्रम  

कऱ्हाड (सातारा): एसटीमध्ये वडिल चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण लागतो या उद्दात हेतूने कऱ्हाडचे आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधू डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडिल बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून एसटीचे चालक-वाहक यांना राहण्यासाठी सुसज्ज असे 29 बेड, वातानुकुलीत रुम, आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलरची सोय केली आहे. चालक-वाहकांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चातून सोय केलेला राज्यातील हा पहिलाचा उपक्रम ठरला आहे. कऱ्हाडमध्ये आरटीओ शिंदे आणि डॉ. शिंदे यांनी चालक-वाहकांसाठी केलेल्या उपक्रमाची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली. त्यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांनी हा उपक्रम राज्यातील सर्व बसस्थानकात राबवण्याची घोषणा मंत्री रावते यांनी केली.

सर्वसामान्यांच्या प्रवासासाठीचे वाहन म्हणून एसटीकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील वाडी-वस्तीसह मोठ्या शहरामध्ये एसटीचे जाळे पसरले आहे. त्यासाठी एसटीचे चालक-वाहक रात्रंदिवस कार्यरत असतात. अनेकदा लांबून प्रवास करुन आल्यावर चालकांना झोपण्यासाठी चांगली सोय नसल्याने त्यांची झोप न झाल्याने अपघात होण्याचेही प्रकार यापुर्वी घडले आहेत. त्यामुळे एसटीने आता चालक-वाहनकांच्या रेस्टरुमची चांगली सोय उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. कऱ्हाडच्या नवीन बसस्थानकाचे उदघाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. तेथे चालक-वाहकांच्या रेस्टरुमची सोय आहे. मात्र, त्याला अधिक चांगली करण्यासाठी आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधु डॉ. बजरंग शिंदे यांनी स्वर्चातून अद्ययावत सोयीची जोड दिली आहे. शिंदे यांचे वडिल एसटीमध्ये चालक होते. त्यामुळे चालकांच्या हालअपेष्टा शिंदेंनी जवळून पाहिल्या आहेत. त्याचा विचार करुन शिंदे कुटुंबीयांनी सुरक्षीत प्रवासासाठी चालकांची झोप नीट होणे महत्वाचे आहे हे जाणून त्यांच्यासाठी एसी रुम, त्यामध्ये झोपण्यासाठी २९ अद्ययावतबेड, आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलरसह अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. चालकांच्या सोयीसाठी स्वखर्चातून केलेला राज्यातील हा पहिलाचा उपक्रम ठरला आहे. तो उपक्रम राज्यात राबवण्याची घोषणा मंत्री रावते यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com