कऱ्हाडमध्ये एसटी चालक-वाहकांसाठी एसी रेस्टरुम 

हेमंत पवार
सोमवार, 7 जानेवारी 2019

कऱ्हाड - एसटीमध्ये वडील चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देणं लागतो या उद्दात हेतुने कऱ्हाडचे (जि.सातारा) आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधु डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडील बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातुन एसटीचे चालक-वाहक यांना राहण्यासाठी सुसज्ज असे २९ बेड, वातानुकुलीत रुम, आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलरची सोय केली आहे.

चालक-वाहकांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चातुन सोय केलेला राज्यातील हा पहिलाचा उपक्रम ठरला आहे. त्यामुळे चालक-वाहक यांची राहण्याची व झोपण्याची चांगली सोय तेथे होणार आहे. 

परिवहन मंत्री रावतेंची घोषणा 
कऱ्हाडमध्ये आरटीओ शिंदे आणि डॉ. शिंदे यांनी चालक-वाहकांसाठी केलेल्या उपक्रमाची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली. त्यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांनी एसटी एकटी काही करु शकत नाही. त्यासाठी लोकसहभागाची जोड देवुन शिंदेचा हा उपक्रम राज्यातील सर्व बसस्थानकात राबवण्याची घोषणा मंत्री रावते यांनी यावेळी केली. 

आमचे वडील २५ वर्षाच्या सुरक्षित सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यांनी मोठ्या कष्टातुन मला आरटीओ आणि बंधुना डॉक्टर केले. एसटीचे चालक-वाहक अत्यंत दुरावस्थेत त्यांची राहण्याची सोय असते. त्यामुळे त्यांची झोप होत नाही. त्यामुळे अपघात होवु शकतो. त्यामुळे सामाजिक सुरक्षा, रस्तासुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन आम्ही चालक-वाहकांसाठी एसीरुम, सुसज्ज बेड, गरम पाणीसह अन्य सुविधा केल्या आहेत. 
- अजित शिंदे,  आरटीओ, कऱ्हाड

Web Title: AC restroom for ST drivers in Karhad