मेरीट दाखविणाऱ्या महापालिका डॉक्‍टरांना "अच्छे दिन' 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 10 जुलै 2018

सोलापूर : महापालिका दवाखान्यातील डॉक्‍टरांना लवकरच "अच्छे दिन' येणार असून, मेरीट दाखविणाऱ्या डॉक्‍टरांना घसघसीत दहा हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार केला जात असून, "रिझल्ट' दाखविणाऱ्यांसाठी हा "बोनस' असेल, असे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सोलापूर : महापालिका दवाखान्यातील डॉक्‍टरांना लवकरच "अच्छे दिन' येणार असून, मेरीट दाखविणाऱ्या डॉक्‍टरांना घसघसीत दहा हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार केला जात असून, "रिझल्ट' दाखविणाऱ्यांसाठी हा "बोनस' असेल, असे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी "सकाळ'ला सांगितले. 

महापालिका दवाखाना म्हटले की बहुतांश रुग्णाकडून नाक मुरडले जाते. मात्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी रुजू झाल्यावर, आरोग्य विभाग सुधारण्याचा संकल्प केला आणि त्यात यशही मिळवले. रुग्णाअभावी वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या दवाखान्यांचे स्वरुपच त्यांनी बदलले. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरु केल्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात हजारो रुपये मोजाव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया या महापालिकेच्या दवाखान्यात मोफत होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांचा ओढा महापालिका दवाखान्याकडे वाढला आहे. 

यापूर्वी रुग्ण नसल्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी व डॉक्‍टर बहुतांश दवाखान्यांमध्ये तसेच प्रसुतीगृहात निवांत बसलेले आढळायचे. आता रुग्णालयात सुविधा झाल्यामुळे त्यांनाही "काम' लागले आहे. रुग्णांसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा आयुक्तांनी प्राधान्याने उपलब्ध करून दिल्यामुळे डॉक्‍टरांनाही काम करण्यास उत्साह येऊ लागला आहे. शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. मोफत सोनोग्राफीची सोय केल्याने गरोदर महिलांचीही सोय झाली आहे. गर्दी होऊ लागल्याने डॉक्‍टरांचेही काम वाढले आहे. आपल्याकडे जी जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या डॉक्‍टरांना हा "बोनस' दिला जाणार आहे. 

सध्या अत्यल्प वेतन व मानधनावर डॉक्‍टर आपली सेवा देत आहेत. रुग्णांचा महापालिका दवाखान्यावर भरवसा वाढला आहे. त्यामुळे "रिझल्ट' देणाऱ्या डॉक्‍टरांना हा "बोनस' देण्यात येणार आहे. मेरीट पूर्ण 
करणाऱ्या डॉक्‍टरांना ही वाढ मिळेल. 
-डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी 
सोलापूर महापालिका 

Web Title: acche din to municipal corporation doctors who shows merit