नातेवाईकांच्या अंत्यविधीवरून परतताना अपघात, दोन ठार

रमेश धायगुडे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

लोणंद (सातारा) : नातेवाईकांच्या अंत्यविधीवरून परतताना लोणंद-फलटण रस्त्यावर तरडगाव हद्दीत पालखी तळानजीक आज मंगळवार (ता.१७ ) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास स्वीफ्ट कार रस्त्याच्या मधील डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात दोन ठार व चार जण जखमी झाले.

मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, पाडेगाव (ता. फलटण) व मांडकी (ता. पुरंदर) येथील सहा जण बुध (ता. खटाव ) येथील नातेवाईकाचा अंत्यविधी अटोपून स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक (एमएच - १२- ७७२७ ) मधून रात्री लोणंद-फलटण रस्त्यावरून पाडेगाव, मांडकीकडे निघाले होते. दरम्यान मध्यरात्री अडीचच्या सुमारास तरडगाव हद्दीत पालखी तळानजीक आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून डिव्हायडरला धडकून हा अपघात झाला. त्यामध्ये चालक संजय शिवाजी धुमाळ (वय ४३, रा. मांडकी ता. पुरंदर, जि. पुणे) व श्रीमती शोभा नंदकुमार धुमाळ (वय ४५ रा. पाडेगाव, ता. फलटण) हे दोघे जागीच ठार झाले.

तर सारिका संजय धुमाळ (रा. मांडकी),कमल दगडू धुमाळ, विजय राजाराम देसाई व मालन विजय देसाई हे सर्व रा. पाडेगाव (ता. फलटण) जखमी झाले आहेत. त्यांना लोणंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे

Web Title: accident 2 dies near lonand satara

टॅग्स