कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोन एसटी बसची धडक, एक ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोन एसटींची समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 62 वर्षीय महिला प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला, तर एसटीतील इतर 15 जण जखमी आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोन एसटींची समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 62 वर्षीय महिला प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला, तर एसटीतील इतर 15 जण जखमी आहेत. संततधार पावसामुळे पुढील रस्ता स्पष्ट न दिसल्याने हा अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

अपघातातील जखमींना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे गेल्या दोन तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

अपघात झालेल्या दोनही एसटी अद्यापही रस्त्यावरच आहे त्या अवस्थेत आहेत. त्या बाजूला करण्यासाठी क्रेन घटनास्थळा दाखल झालेली नाही. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत. 

Web Title: accident between 2 st buses one dies