मोहोळ येथे दोन कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मोहोळ येथे दोन कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत.

मोहोळ - तालुक्यात झालेल्या दोन मोटार अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य सहा जण जखमी झाले. पहिला अपघात पंढरपूर मोहोळ राज्य मार्गावरील पेनूर शिवारातील कोन्हेरी फाट्याजवळ तर दुसरा अपघात याच मार्गावरील पोखरापूर शिवारारातील माने वस्तीजवळ झाला. 

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात कोन्हेरी फाटयाजवळ झाला. ओमिनी कार क्र एम एच 10 बी एम 7142 ही तुळजापूराहुन देवदर्शन आटोपुन पंढरपूरकडे निघाली होती. तर दुसरी कार क्र एम एच 09 एबी 3043 ही पंढरपूराहून लातुरकडे निघाली होती. दोन्ही वाहने कोन्हेरी फाट्याजवळ येताच त्यांची समोरासमोर धडक झाली. त्यात तानाजी कृष्णा किरदतकर, छाया कृष्णा किरदतकर, सुधीर जाधव, दिप्ती तुषार किरदतकर, मुक्ताबाई भिमराव घोरपडे सर्व रा. रानवी ता. खानापूर अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
दरम्यान त्याचवेळी मोहोळ चे नगराध्यक्ष रमेश बारसकर हे हल्लाबोल यात्रेसाठी सांगोल्याकडे निघाले होते. त्यांनी अपघात पाहताच खाली उतरून जखमींना उपचारासाठी पाठविले. दुसरा अपघात याच मार्गावर पोखरापुर शिवारातील माने वस्ती जवळ दुपारी 1 वाजता झाला. कार क्र एम एच 13 बी एन 6123 ही पंढरपूरहून मोहोळकडे भरधाव निघाली होती. ती पोखरापूर शिवारातील माने वस्तीजवळ येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती निंबाच्या झाडाला धडकली. त्यात अश्वीन महादेव सुरवसे रा. मोहोळ हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावला. तर विश्वजीत रामचंद्र बिले रा. मोहोळ हा जखमी झाला. दोन्ही अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून तपास हवालदार नागप्पा निंबाळे करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Accident between two cars one died one injured