बिस्किटांपेक्षाही आता स्वस्त झालाय माणूस...?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

लेंगरे - ट्रक आणि टॅंकरच्या धडकेनंतर लागलेल्या आगीत तीन माणसं होरपळली. क्षणात आगीनं असा रुद्रावतार धारण केला की, रस्त्यावरचं डांबर वितळलं; तिथं माणसं कशी जगायची? दुसऱ्या दिवशी मात्र अपघातातील ट्रकमधून पडलेल्या बिस्टिकांचे पुडे जळलेल्या लोकांच्या हाडांमधून वेचून निगरगट्ट मनांचं दर्शन काहीजणांनी दर्शवलं.... माणुसकीला काळिमा लावणारं असंच हे दृश्‍य होतं...!

सांगली-भिगवण महामार्गावर दोन वाहनांमध्ये रविवारी (ता. २३) झालेल्या भयानक अपघातामुळे परिसरातील लोकांच्या डोळ्यांसमोर अजूनही आगीचे लोळ भिरभिरत आहेत.

बिस्किटानं भरलेल्या टेंपोनं सिंमेटच्या टॅंकरला धडक दिली, अन्‌ दोन्ही गाड्या धडाडा पेटल्या. टॅंकरमधल्या एकानं उडी मारली; परंतु तो पुरा पेटला होता. त्याच्या झळाच दोनशे मीटरवर लागत होत्या. त्यामुळे त्याला कोणीही वाचवू शकलं नाही. तंदुर भट्टीत कोंबडी भाजते, तसा माणूस होरपळून हातापायाला आकड्या येऊन मृत्युमुखी पडला.

आगीत सापडल्यावर कोण पुरुष अन्‌ कोण महिला! रस्त्यावरचं डांबर  वितळलं; तिथं माणसाची काय धडगत असायची? क्षणार्धात सगळं खाक झालं. अग्निशमन दल पोलिस उपनिरीक्षक धनाजी पिसाळ, पत्रकार रामदास साळुंखे, अमोल हत्तरगीकर यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी अथक प्रयत्नांनी सगळी आग विझविली आणि पोकलेननं दोन्ही गाड्या बाजूला ढकलून काढण्यात आल्या. मृत गुलबर्गा जिल्ह्यातील होते. या लागलेल्या आगीमुळे पाच-सहा तास वाहतूक ठप्प झाली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र माणुसकीला काळिमा लावणारं चित्रंही दृष्टीला पडत होतं. अपघाताच्या ठिकाणी गर्दी जमली होती. चार-पाच गाड्या उभ्या होत्या.  जमलेले लोक शेतात काट्या वेचतात तशी बिस्किटं शोधत होते. जळालेले पुडे वेचत असतानाच टेंपोतील जळालेल्या माणसांच्या अस्थीसुद्धा त्यातच मिसळल्या होत्या, मात्र महिला पदरात बिस्किटांचे पुडे भरत बसल्या होत्या. हे चित्र पाहून कुठं चाललाय माणूस? काल ज्यांना वाचवायला कोण पुढे जाऊ शकत नव्हतं, तर आज त्यांच्याच हाडकांशेजारील बिस्किटांचे पुडे उचलणारे लोक बघितल्यावर मन सुन्नच होईल, नाही तर काय? खरंच बिस्किटांपेक्षाही माणूस स्वस्त झालाय...

Web Title: Accident on Bhigavan Road Human Interest story