नगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार

नगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार

श्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील नटराज विठोबा शिर्के (राहणार बाबुर्डी ता. श्रीगोंदे वय ५६) व त्यांची मुलगी कल्पना संतोष कदम (वय २८ राहणार पिंपळगावपिसे ता. श्रीगोंदे) यांना जवळून जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यामध्ये दोघांचाही मृत्यु झाला. परतम, अपघात यात सात वर्षाची मुलगी मात्र वाचली.

नगर-दौंड महामार्गाचे नव्याने सुरु असणाऱ्या कामात यापुर्वीची अपघात होवून बळी गेले आहेत. आज पुन्हा एकदा त्यात भर पडली. हा रस्ता तीन पदरी असून मध्यभागी दुभाजक नाही. त्यामुळे समोरुन येणाऱ्या वाहनाच्या गतीचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.

आज दुपारी बाराच्या सुमारास मढेवडगाववरुन काष्टीच्या दिशेने त्यांच्या दुचाकीवरुन मयत शिर्के त्यांची मुलगी कल्पना व छोटी मुलगी असे जात होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या (नाव व पत्ता समजला नाही) येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला जोराची धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की शिर्के व कल्पना कदम हे बाप-लेकी गाडीवरुन खाली पडले. त्याचवेळी जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यात शिर्के यांचा जागीच मृत्यू झाला तर कल्पना कदम यांना रुग्णालयात हलविल्यानंतर त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती तेथील सामाजीक कार्यकर्ते दत्तात्रेय शिर्के यांनी दिली. दरम्यान समोरुन येणाऱ्या दुचाकीवरील दोघेही जखमी असून त्यांना रुग्णालयात हलविले आहे. 

दरम्यान शिर्के व कदम या बाप-लेकींच्या मध्यभागी बसलेली आराध्या ही सात वर्षांची नटराज शिर्के यांच्या मुलाची मुलगी मात्र अपघातातून वाचल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान हा अपघात न्यू इंग्लिश स्कुलच्या समोर झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. विद्यार्थी या रस्त्याने जात असल्याने गावाच्या जवळ तरी रस्त्यावर दुभाजक टाकण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com