जत तालुक्यात अपघातामध्ये चंदुरचा तरूण ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

जत - रामपूर (ता. जत) गावाजवळील वळणावर दुचाकी दगडी बांधकामास धडकून अपघात झाला. यात दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. रूपेश बाबासो पाटील (वय २९, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे.

तालुक्यातील काराजंगी गावी सासरवाडीकडे रूपेश हे निघाले होते.  सकाळी साडे सहा वाजता फिरायला जाण्याऱ्या शरद शिवशरण यांनी घटनेची माहिती जत पोलिसात दिली आहे. या अपघातामध्ये प्रेमानंद कृष्णा कोरपडे (वय ४०, दोघे रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in Jat Taluka one dead