कोल्हापूर शहरात आलिशान मोटारीने पाच दुचाकींना उडवले, सात जण जखमी 

कोल्हापूर शहरात आलिशान मोटारीने पाच दुचाकींना उडवले, सात जण जखमी 

कोल्हापूर - आज दुपारी शहरातील गजबजलेल्या दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंम्बली रोडवर एका भरधाव मोटार चालकाने धुमाकूळ घातला. चालकाने आडव्या येणाऱ्या पाच दुचाकी वाहनांना अक्षरशः चिरडले. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.  शिवाय सात जण जखमी झाले.

आलिशान मोटारीचा टायर फुटलेल्या अवस्थेत असूनही चालकाने त्याच्यासह इतरांचा ही जीव धोक्यात घातला. अखेर शासकीय विश्रामधामच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका हॉटेलच्या दारात ही मोटार लावून चालकासह त्याचे साथीदार पसार झाले. ते जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे हॉटेल मालकांनी पोलिसांना सांगितले. 

जयंती नाल्या शेजारील जुन्या ट्रिफिक ऑफीस समोर संबधित मोटार चालक व एका वकील महिलेचा वाद झाला. तेथे लोकांची गर्दी जमली. ही गर्दी पाहून घाबरलेल्या चालकाने इतर वाहनांना ठोकर देत मोटार भरधाव वेगात नेली. दसरा चौक येथे तीन, असेंम्बली रॉड येथे दोन वाहनांना मोटारीने धडक दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com