लोणंद-निरा रस्त्यावर भीषण अपघात; एक मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

लोणंद : लोणंद - निरा रस्त्यावर बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपासमोर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिकअप व बोलेरो गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शेडगेवाडी (ता.खंडाळा) येथील गुलाब सतु हाके (वय ५४) यांचा मृत्यू झाला तर अन्य 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

शेडगेवाडी येथील हिंदुराव दत्तू हाके कुटुंबियांना घेऊन पिकअप जीपमधून (एम.एच.१२ के. पी.- ७६३८) नीरा-लोणंद रस्त्यावरून नीरा बाजूकडे मासाळवाडी ( ता. बारामती) नजीकच्या नायकोबाचीवाडी येथे देव दर्शनासाठी निघाले असताना बाळुपाटलाची वाडी गावच्या हद्दीत बागवान पेट्रोल पंपाचे पुढे असलेल्या सर्विसिंग सेंटरच्याजवळ आल्यावर नीरा बाजूकडून भरधाव वेगात लोणंदकडे येत असणारी बोलेरो (एमएच ४२ के. ८७६६) यांच्यात समोरा-समोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला.

पिकअप व बोलेरो यांच्यातील समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती की यात पिकअप जीप रस्त्याच्या कडेला पलटी झाली होती. तर बेलोरो जीप गाडीचाही पुढचा चालकाच्या बाजूचा पूर्ण भाग चक्काचूर झाला.

बोलेरोचे चालक तेजस विठ्ठल बोराटे रा. ल्हासुर्णे (ता. इंदापूर) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी विरूद्ध दिशेने येऊन पिकअपला उजव्या बाजूस जोराची धडक दिली. त्यावेळी पिकअप पलटी होऊन पिकअपमधील गुलाब सतू हाके यांचा जागीच मृत्यू झाला. तर रखमाजी सतू हाके, जयश्री सोपान हाके, मंगल धोंडीबा हाके, तायडाबाई गुलाब हाके, रंगुबाई सतु हाके, सुधांशू धोंडीबा हाके , सुनिल गुलाब हाके, रमेश हिंदुराव हाके, दिपाली कोंडीबा हाके, बाळू विठू हाके हिंदुराव हाके हे सर्वजण रा. शेडगेवाडी (ता. खंडाळा) हे गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणंद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत हिंदुराव हाके यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, लोणंद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार हे अधिक तपास करत आहेत.
 
Web Title: Accident on Lonand Nira Road One dead