मंगळवेढ्यातील दुचाकी अपघातात सासू-सुनेचा मृत्यू

Accident in Mangalvedha
Accident in Mangalvedha

मंगळवेढा : रस्त्याच्या कामासाठी जाणाऱ्या अज्ञात क्रमांकाच्या टिपरने मोटरसायकलला धडक दिल्याने सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाटील कुटुंबियावर दुखाचा डोंगर पसरला असून अपघातात बचावलेल्या लहान बालकाचा आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले. अपघातानंतर टिपर फरार झाला असून ग्रामस्थांनी मागून येणारा टिपर रोखून धरला.

हा अपघात निंबोणी भाळवणी रोडवर झाला असून, या अपघातात मुलगा आणि नातू किरकोळ जखमी झाले आहेत. शुक्रवारच्या आठवडा बाजार व बँकेच्या कामासाठी निंबोणीला जाऊन मोटरसायकलवरून परत येत असताना शैलेश बसवेश्वर पाटील हे मोटरसायकल चालवित होते. दुचाकीमागे अर्चना बसवेश्वर पाटील (वय 70) व मोनाली शैलेश पाटील (वय 35 सर्व  जण रा.भाळवणी) यामधील सासू सुनाचा जागीच मृत्यू  झाला. नागरिकांनी 108 रूग्णवाहिकेला फोन केला.

अपघातानंतर तासाने रूग्णवाहिका आली. दरम्यान खासगी वाहनातून जखमी शैलेश पाटील याला दवाखान्यास पाठवण्यात आले. मृतदेह हालविण्यास ग्रामस्थानी नकार दिला. मंगळवेढा ते निंबोणी हा रस्ता अरूंद असून, रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मंगळवेढा ते उमदी व अन्य महामार्गाच्या कामामुळे जड वाहने या मार्गाने जात आहेत.

या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला असून, पण बांधकाम  खात्याने रस्ता  रूंदीकरण करण्यास विलंब केला आणखी किती बळीची वाट पाहणार असा सवाल ग्रामस्थामधून विचारला जात आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना ग्रासस्थानी अपघाताची माहिती दिली असून पोलिस घटनास्थळी  दाखल झाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com