सांगली : ऊसाच्या ट्रॉलीवर मोटार आदळून 3 ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मोटार चालक दीपक संजय जाधव (वय 25, साळशिंगे, ता. खानापूर), नंदकुमार बबन चव्हाण (वय 38, बुधगाव, ता. मिरज), उदय परशुराम पाटील (वय 45, बेडग, ता. मिरज) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर उदय विठ्ठल कांबळे (वय 32, बनपुरी, ता. आटपाडी) हा जखमी झाला. 

सांगली - मिरज-कोल्हापूर रस्त्यावर धामणी फाट्याजवळ थांबलेल्या ऊसाच्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीवर भरधाव स्वीफ्ट मोटार आदळून तीन ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता अपघात झाला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.

मोटार चालक दीपक संजय जाधव (वय 25, साळशिंगे, ता. खानापूर), नंदकुमार बबन चव्हाण (वय 38, बुधगाव, ता. मिरज), उदय परशुराम पाटील (वय 45, बेडग, ता. मिरज) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर उदय विठ्ठल कांबळे (वय 32, बनपुरी, ता. आटपाडी) हा जखमी झाला. 

अधिक माहिती अशी, स्वीफ्ट मोटार (एमएच 10 एजी 1261) ही काल रात्री साडेबारा वाजता कोल्हापूरहून अंकलीमार्गे मिरजेकडे येत होती. मिरजेजवळ धामणी फाट्यावर ऊसाने भरलेली ट्रॅक्‍टर-ट्रॉली रस्त्याकडेला उभी करण्यात आली होती. चालक दीपक जाधव वेगाने मोटार चालवत होता. धामणी फाट्याजवळ समोर थांबलेली ऊसाची ट्रॉली त्याला दिसली नाही. त्यामुळे मोटार ट्रॉलवर वेगाने आदळून चक्काचूर झाला. चालक जाधव, नंदकुमार चव्हाण, उदय पाटील हे जागीच ठार झाले. तर उदय कांबळे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कांबळे याला मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे.

Web Title: accident on miraj-kolhapur highway