नगरजवळ अपघातात 7 जण ठार

सूर्यकांत नेटके
बुधवार, 24 मे 2017

मृतांमध्ये मनोहर रामदास गायकवाड (वय 45), मुबारक अबनास तांबोळी (वय 56), बाळू किसन चव्हाण (वय 50), स्वप्निल बाळू चव्हाण (वय 17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (वय 40), अरुण पांडुरंग शिंदे (वय 50) आणि अंकुश दिनकर नेमाळे (वय 45) यांचा समावेश आहे.

नगर - नगर-औरंगाबाद मार्गावर धनगरवाडी येथे आज (बुधवार) पहाटे बोलेरो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जण ठार झाले आहेत. सर्व मृत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथील रहिवाशी आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत येथील नागरिक औरंगाबादकडे जात असताना आज पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. बोलेरोला (एमएच 12 एफएफ 3382) समोरून येणाऱ्या ट्रकने (एमएच 20 एटी 4650) धडक दिल्याने बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात बोलेरो गाडीतील सात जण जागीच ठार झाले. हे सर्व बुलडाणा जिल्ह्यातील बाबा सैलानी येथे दर्शनासाठी जात होते.

मृतांमध्ये मनोहर रामदास गायकवाड (वय 45), मुबारक अबनास तांबोळी (वय 56), बाळू किसन चव्हाण (वय 50), स्वप्निल बाळू चव्हाण (वय 17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (वय 40), अरुण पांडुरंग शिंदे (वय 50) आणि अंकुश दिनकर नेमाळे (वय 45) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे. अपघाताची बातमी समजताच यवत गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: accident on nagar-aurangabad highway, 7 dead