नगर-दौंड मार्गावर अपघात एक जण ठार

daund
daund

श्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या मालमोटारीवर पाठीमागून आलेली गाडी आदळून हा अपघात झाला.

रामलखन प्रितमसिंह बघेल वय २५ राहणार पिपरुह, ढोलपूर राजस्थान असे मयताचे नाव आहे. श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे कर्मचारी विकास वैराळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मढेवडगाव येथे नगर दौड रस्त्याच्या कडेला त्याची गहू  घेऊन जाणारी मालमोटार क्रमांक आर जी ०९ जी डी १६१९ उभी करून झोपला होता. नगरच्या दिशेने पाठीमागून बटाटा घेऊन येणाऱ्या आर जी ११ जीआर ६१७० मालमोटारीने समोर उभ्या असणाऱ्या गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली.

बटाटा घेऊन जाणाऱ्या गाडीचा चालक रामलखन बघेल हा क्लिनरच्या बाजूला झोपला होता तर गाडीचा क्लिनर हा काही काळ चालक झाला होता. ज्यावेळी धडक बसली त्यावेळी बाजूला झोपलेला रामलखन गंभीर जखमी होऊन मयत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com