सुप्याजवळ अपघात दोन ठार; दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नगर : नगर-पुणे रस्त्यावर सुप्याजवळील चास शिवारात आज रात्री 10 वाजता कंटेनर व कारची जोरदार धडक झाली. त्यात दोन जण जागीच ठार झाले; तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नगर तालुका पोलिस रात्री उशिरापर्यंत जखमींच्या नावाची खातरजमा करीत होते. 

नगर-पुणे महामार्गावर चासजवळील वळणावर जीप (क्र. एमएच 42, एएस 8219) नगरहून पुण्याकडे जात होती. याचवेळी पुण्याहून नगरकडे जाणारा कंटेनर (एमएच 12, क्‍युबी 1252) दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला गेला व जीपवर आदळला.

या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार; तर काहीजण जखमी झाले. जीपमधील प्रवासी बारामती येथील असल्याचे जखमी प्रवाशांनी सांगितले.

या अपघातामुळे नगर-पुणे मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास विस्कळित झाली. 

Web Title: Accident on Nagar Pune road