अंकली टोल नाक्याजवळ कंटेनर बुडाला ओढ्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

जयसिंगपूर - सांगली - कोल्हापूर मार्गावर उदगाव अंकली टोल नाक्याजवळ असलेल्या ओढ्यात कंटेनर उलटला. राजस्थानहून सांगलीकडे हा कंटेनर जात होता.

जयसिंगपूर - सांगली - कोल्हापूर मार्गावर उदगाव अंकली टोल नाक्याजवळ असलेल्या ओढ्यात कंटेनर उलटला. राजस्थानहून सांगलीकडे हा कंटेनर जात होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूरहून तमदलगे खिंड मार्गे हा कंटेनर मध्यरात्री जात होता. अंकली नाक्याजवळच्या ओढात कृष्णा नदीच्या पुराचे पाणी पसरले होते. याचा अंदाच चालकाला न आल्याने हा अपघात झाला. पाण्यातून जाताना कंटेनर ओढ्यात उलटला. या अपघातामध्ये चालक आणि त्याचा साथीदार मात्र बचावले.  महेंद्रसिंग असे चालकाचे नाव आहे.

दरम्यान पूरस्थितीमुळे जयसिंगपुर पोलीस आणि अंकली टोलनाक्यावर बॅरिकेट्स लावलेले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident near Ankali Toll Naka