शाहुवाडी तालुक्यात रिक्षा - ट्रक अपघातामध्ये एक ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

  • डोणोली (ता. शाहूवाडी) येथे रिक्षा आणि ट्रक यांच्यात अपघात.
  • अपघातामध्ये एकजण ठार तर सहाजण जखमी
  • कृष्णा रामचंद्र चव्हाण (45 रा. खुटाळवाडी,  ता. शाहूवाडी) असे मृताचे नाव. 

कोल्हापूर - डोणोली (ता. शाहूवाडी) येथे रिक्षा आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण ठार तर सहाजण जखमी झाले आहेत.  कृष्णा रामचंद्र चव्हाण (45 रा. खुटाळवाडी,  ता. शाहूवाडी) असे मृताचे  नाव आहे

जखमींची नावे अशी सुनिता माणिक किटे (35, खुंटालेवाडी), शंकर चंदर कांबळे (49, रा. सुपात्रे), अनिता आनंदा बोरगे (21, रा. वरेवाडी), सविता दिलीप पाटील (रा. बिऊर ता. शिराळा). जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की दामाजी व्हनागडे हे रिक्षातुन प्रवासी वाहतूक करतात. रोज बांबवडे ते सुपात्रे वाहतुकीचा व्यवसाय ते करतात. आज दुपारी चारच्या सुमारास रिक्षातुन (  एम. एच. ०९ इ एल १५२०) बांबवडेहुन सुपात्रेला प्रवाशांना घेऊन ते निघाले होते. डोणोलीमध्ये पोहचल्यानंतर कोल्हापूरहुन भरधाव येणाऱ्या ट्रकने  (के. ए. २८ डी ३८४५) रिक्षाच्या मागील बाजूस जोराची धडक  दिली. यात  कृष्णा रामा चव्हाण यांचा जागीच मृत्यु झाला. तर  सोहम दिलीप पाटील (६ )व सविता दिलीप पाटील (३५, बिऊर ता. शिराळा), बाळाबाई आकाराम यादव ( ६० रा.  सुपात्रे), सुनिता माणिक किटे (३५, रा. खुटाळवाडी), शंकर चंदर कांबळे (४५, रा. सुपात्रे), राधिका आनंदा बोरगे (२१, रा वरेवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर येथे दाखल केले आहे.

ट्रक चालक यवनाप्पा बलभील मेलिमीनी (२७, रा. देवरहीप्परगी ता, सिंंदगी, कर्नाटक) हा दारूच्या नशेत ट्रक चालवत असल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सुटल. त्यामुळे अपघात घडला अशी माहिती शाहुवाडी पोलिसांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident near Donoli in Shahuwadi Taluka one dead