कोल्हापूर : अमेणी घाटात अपघात; तीन युवक ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शाहूवाडी - मलकापूर ते कोकरूड दरम्यानच्या घाटात पेरीड गावाजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन युवक ठार झाले. अजय कृष्णात बिळासकर (18), दिपक मारूती कदम(17) व अमर वसंत कदम (17) (सर्वजण रा. अमेणी, ता.शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. 

शाहूवाडी - मलकापूर ते कोकरूड दरम्यानच्या घाटात पेरीड गावाजवळ अमेणी घाटात ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन युवक ठार झाले. अजय कृष्णात बिळासकर (18), दिपक मारूती कदम(17) व अमर वसंत कदम (17) (सर्वजण रा. अमेणी, ता.शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अजय, दिपक व अमर हे तिघे मित्र मोबाईलचा बॅलेन्स संपल्याने तो भरण्यासाठी मोटारसायकलने (एम. एच. 09 - 8896) मलकापूरला आले होते. काम झाल्यानंतर तिघे परत गावी निघाले. त्यावेळी कोकरूडवरून मलकापूरकडे येणाऱ्या ट्रकची (एम. एच. 09 - एल 9598) घाटातील उतारात मोटारसायकलला धडक बसली. त्यात मोटारसायकल एका बाजूला पडली. तर हे तिघे ट्रक खाली गेले. तिघांचाही डोक्याला जबरी मार लागल्याने ते जागीच ठार झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident near Perid village three dead