पेरणोलीजवळ अपघातामध्ये एक युवक ठार

रणजित कालेकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

आजरा - पेरणोली (ता. आजरा) नजिक आजरा - देवकांगाव मार्गावर एकलओपाजवळ दुचाकीची उसाने भरलेल्या ट्रॅक्टराला जोराची धडक बसली. या धडकेत पेरणोली येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. अनिकेत मारूती भोकरे (वय 23) असे या ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. 

आजरा - पेरणोली (ता. आजरा) नजिक आजरा - देवकांगाव मार्गावर एकलओपाजवळ दुचाकीची उसाने भरलेल्या ट्रॅक्टराला जोराची धडक बसली. या धडकेत पेरणोली येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. अनिकेत मारूती भोकरे (वय 23) असे या ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी बाराच्या सुमारास झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ट्रॅक्टर ऊस भरून तांबाळे (ता. भुदरगड) येथील साखर कारखान्याकडे निघाला होता. यावेळी पेरणोलीहून दोन युवक आजऱ्याला निघाले होते. पेरणोलीपासून दीड किलोमीटर अंतरावर एकलआेपाजवळ वळणाच्या उतारावर दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसली. यामध्ये पेरणोलीतील हे युवक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले पण वाटेतच अनिकेत याचा मृत्यू झाला. 

दरम्यान संदिप दिनकर हावलदार (वय २३) असे दुसऱ्या जखमी युवकाचे नाव आहे. या अपघातानंतर उसाची ट्राॅली रस्त्यावर उलटल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तासापेक्षा जास्त काळ ठप्प झाली होती.

Web Title: accident Near Pernoli one dead