स्पीडब्रेकरवरून कार उडाली; खणीत बुडाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

कोल्हापूरः भरधाव कार स्पीडब्रेकरवर नियंत्रित न झाल्याने अक्षरशः उडून 35 फूट दूरवर रंकाळा तलावाजवळच्या खोल खणीत बुडाली. आज (शनिवार) दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना कोल्हापुरात घडली. कार उडून खणीत बुडण्याची अशा स्वरुपाची ही पहिलीच घटना आहे.

संध्याकाळपर्यंत एक मृतदेह हाती आला आहे. कोल्हापूर महापालिकेचे अग्निशामक दल आणि व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेचे जवान मृतदेह शोधत आहेत. कार नेमकी कोणती होती, हे स्पष्ट झालेले नाही. 

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या माहितीनुसार, कार खणीच्या मार्गे शालीनी पॅलेसच्या दिशेने निघाली होती. हा रस्ता कमी रहदारीचा आहे. तेथील स्पीडब्रेकरवर कार नियंत्रित होऊ शकली नाही. त्यामुळे कार अक्षरशः हवेत उडाली आणि रंकाळ्यालगतच्या खोल खणींकडे गेली. स्पीडब्रेकरपासून खण सुमारे 35 फुटांवर आहे. वाटेत झाडेही आहेत. दोन झाडांच्या मधून कार घरसत जाऊन थेट खणीत कोसळली. 

हाती आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. राहूल बजरंज जाधव असे मृताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्कुबा डायव्हर्सनी खणीतील खोल पाण्यात बुडी मारून कार शोधली.

Web Title: Accident near Rankala at Kolhapur

व्हिडीओ गॅलरी