बेळगावात भररस्त्यात धावत्या टेम्पोने घेतला पेट

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
बेळगावात भररस्त्यात धावत्या टेम्पोने घेतला पेट

बेळगाव : धावत्या मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवार (२३) रात्री तिसरे गेटनजीक घडली. या प्रकरणी उद्यमबाग पोलिस ठाण्यात प्रकाश विठ्ठल सांबरेकर (रा. दुसरी गल्ली लक्ष्मीनगर बाळेकुंड्री) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

चिकनची वाहतूक करणारा मालवाहू टेम्पो काल रात्री साडेआठच्या सुमारास बेळगावहून खानापूरकडे जात असताना खानापूर रोडवरील पराटा कॉर्नरनजिक टेम्पोने अचानक पेट घेतला. त्यामुळे चालकाने बाहेर उडी घेत आपला बचाव केला. भररस्त्यात टेम्पोने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. याप्रकरणी शुक्रवार (२४) पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. टेम्पोतील एसीमुळे शॉर्टसर्किट होऊन आगीची दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेळगावात भररस्त्यात धावत्या टेम्पोने घेतला पेट
Healthy and Tasty - घरीच बनवा चिक्कू ज्युस, वाचा सोपी रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com