पुणे - सातारा महामार्गावर अपघात, 2 ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

खंडाळा (सातारा) : पुणे - सातारा महामार्गावर खंबाटकी घाटातील बोगदा ओलाडल्यानंतर वळणावर आज पहाटे पाच वाजण्या सुमारास आयशर टेम्पो (गाडीक्रमांक एमएच 07 - 1970 ) उलटला. भरधाव वेगात गाडीवरचा ताबा सुटल्याने टेम्पो कठड्यावर व लोखंडी ग्रीलला जोरदार धडकुन खोल दरीत कोसळला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला असुन, पुढील उपचारासाठी सातारा येथे हलवले आहे.

हर्षवर्धन आचुत गावडे (33) व गजानन लक्ष्मणन राणे (48) अशी मृतांची नावे आहेत. स्वप्निल संतोष लाचये रा.सावंतवाडी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Accident on Pune - Satara highway, 2 killed