पुणे-सातारा रस्त्यावर एस कॉर्नरवर अपघात; चौघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आज सकाळी कोल्हापूरहून मुंबईला भारत दुध डेअरीचे दूध टँकर जात असताना खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर भरधाव वेगात बंगळूरहून मुंबईला जाणाऱ्या मालट्रक गाडीक्रमांक (केए 51 -2248 ) ने पाठीमागुन जोराची धडक दिली. यावेळी महामार्गावरील लोखंडी रेलिंग तोडुन दुध टँकर (गाडीक्रमांक एम-एच 46 एफ 5491) पलटी झाली. तर परच्युटन साहित्य घेऊन जाणारा ट्रक ही पुढे तीस फुटावर पलटी झाला.

खंडाळा (जि. सातारा) : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील कुप्रसिध्द असलेल्या एस कॉर्नरवर आज (रविवार) सकाळी आठ वाजता एक टँकर व एक मालट्रक पलटी होऊन चार जण गंभीर जखमी झाले. यामध्ये एका मुलीचा ही समावेश आहे.

आज सकाळी कोल्हापूरहून मुंबईला भारत दुध डेअरीचे दूध टँकर जात असताना खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर भरधाव वेगात बंगळूरहून मुंबईला जाणाऱ्या मालट्रक गाडीक्रमांक (केए 51 -2248 ) ने पाठीमागुन जोराची धडक दिली. यावेळी महामार्गावरील लोखंडी रेलिंग तोडुन दुध टँकर (गाडीक्रमांक एम-एच 46 एफ 5491) पलटी झाली. तर परच्युटन साहित्य घेऊन जाणारा ट्रक ही पुढे तीस फुटावर पलटी झाला.

यामध्ये ट्रक चालक सय्यद हुसेन सय्यद अब्बास नौशाद (वय 27 रा.शिरा राज्य कर्नाटक), टँकर चालक देविदास बंडु कांबळे (वय 37) टँकरमध्ये बसलेले ग्लोरोडिया प्रकाश डिसोझा (वय 37) व मुलगी वेणिशा प्रकाश डिसोझा (वय 12 दोघे रा.कराड) गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथे हलविण्यात आले. या अपघातावेळी टँकर व ट्रक चालक अपघातग्रस्त गाडीत अडकले होते. यावेळी खंडाळा पोलिस नितीन नलवडे, विजय पिसाळ, भगवान मुठे, बालाजी वडगावे, शिवशंकर तोडेवाड व हायवे पोलिस यांनी क्रेन बोलावुन गाडीतुन जखमींना बाहेर काढले. दवाखान्यात पाठविले. तसेच यानंतर मालट्रकलाही महामार्गावरुन बाजुला करण्यात आले. टँकर तर माञ महामार्गापासुन बाहेर पडले होते. यावेळी महामार्गावरील वहातुक काही काळ थांबविण्यात आली होती.

Web Title: accident on Pune-Satara road 4 injured