पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात ; एक मृत्युमुखी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात ; एक मृत्युमुखी

कळस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोटारकारने दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना आज दुपारी अडीचच्या सुमारास घडली. सुरेश सदाशिव जामदार (वय 59, रा. कोकणगांव, ता. श्रीगोंदा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दत्तात्रेय महादेव जामदार (रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा) हे जखमी झाले आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावरुन सुरेश जामदार व दत्तात्रेय जामदार हे मोटारसायकलवरुन (क्र.एम.एच. 16, ए.बी. 9875) इंदापूरहून भिगवणच्या दिशेने निघाले होते. लोणीदेवकर येथील तोंडेवस्तीजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्वीफ्ट डिजायर मोटारीने (क्र. एम.एच.12 क्यू.एफ. 2552) त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये सुरेश जामदार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर दत्तात्रेय जामदार हे जखमी झाले. अपघातानंतर मोटारकारचा चालक वाहन सोडून पळून गेला. अपघातग्रस्तांना इंदापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

महामार्ग पोलिस केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभंग, पोलिस काॅन्स्टेबल संतोष काळे, यशवंत पवार, संजय मल्हारे, अमित बनकर, संतोष कांबळे घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com