टायर फुटल्याने शिवशाही बसला अपघात

संतोष चव्हाण
रविवार, 29 जुलै 2018

उंब्रज येथे सातारा ते कऱ्हाडच्या लेनवर एस. टी. महामंडळाची शिवशाही बस (एम. एच. ४७ वाय. ०९७७) चालकाचा ताबा सुटून दुभाजकावर आदळली.

उंब्रज (ता. कऱ्हाड) - टायर फुटल्याने शिवशाही बसला येथे अपघात झाला. रस्त्याचे दुभाडक फोडून बस पलीकडच्या बाजूला गेली. त्यात सुदैवाने केवळ दोघांनाच किरकोळ मार लागला आहे. अन्य प्रवासी सुखरूप आहेत. 

उंब्रज येथे सातारा ते कऱ्हाडच्या लेनवर एस. टी. महामंडळाची शिवशाही बस (एम. एच. ४७ वाय. ०९७७) चालकाचा ताबा सुटून दुभाजकावर आदळली. यावेळी बसचा टायर फुटून दुभाजकावर थांबली. या अपघातात २ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सदरची घटना आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली. 
   
उंब्रजच्या हद्दीत पुणे ते बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा बाजूकडून कराड बाजूकडे जाणारी एस. टी. महामंडळाची ठाणे ते सांगली शिवशाही बसच्या चालकाचा ताबा सुटला. ती बस दुभाजकावर आदळली यावेळी गाडीचा टायर फुटुन बस दुभाजकाच्या मधोमध जाऊन थांबली. या अपघातात बस निरगीलीचे झाडाला घासून गेली आहे. या अपघात बसमधील २ जण जखमी झाले आहेत. 
 

Web Title: The accident of Shivshahi bus because of the tire broke