रस्त्याच्या कडेच्या कठड्याला मोटार धडकून एकाचा जागीच मृत्यू

राजकुमार शहा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर): भरधाव निघालेली तवेरा रस्त्याच्या कडेच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. आपघात आज (शुक्रवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास वडवळ फाटयाजवळ घडला.

मोहोळ (सोलापूर): भरधाव निघालेली तवेरा रस्त्याच्या कडेच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. आपघात आज (शुक्रवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास वडवळ फाटयाजवळ घडला.

परवेजसाहेब हजरत जहागिरदार (वय 55, रा. बिल्ली मोरया बिल्डींग आसर मेहल स्ट्रीट विजापूर) असे मृताचे नाव आहे. बिपाशा साहेब हजरत जहागिरदार (65), अमि रोज परवेज जहागिरदार (50), तमण्णा परवेज जहागिरदार (22), सुजाळी शहजादे जहागिरदार (9), तनाज शहजादे जहागिरदार (6), किसन मोतीलाल राठोड (21 अरकेरी चालक ) अशी जखमींची नावे असून, सर्वजण विजापूर येथील रहिवाशी आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, वरील जखमी व मृत जहागीरदार कुटुबीय पुण्याहुन परदेशी जाणाऱ्या मुलाला विमानतळावर सोडून परत विजापूरकडे निघाले होते. तवेरा कार वडवळ जवळ येताच पहाटेची वेळ असल्याने भरधाव निघालेल्या तवेरा वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार राष्ट्रीय महामार्गाच्या कडेच्या कठड्याला जोरात धडकली. त्यात परवेज जहागिरदार हा गंभीर जखमी झाला त्याला उपचाराला नेताना तो उपचारापुर्वीच मयत झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. या अपघाताची खबर शरद दामोदर अतकरे (रा. अवंती नगर सोलापूर) याने मोहोळ पोलिसात दिली आहे. तपास हवालदार अविनाश शिंदे करीत आहेत.

Web Title: accident solapur highway one dead