टाकळी ढोकेश्वर: दोघांना टेम्पोने उडवले, एक ठार, एक जखमी

सनी सोनावळे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

टाकळी ढोकेश्वर - नगर - कल्याण महामार्गवर टाकळी ढोकेश्वर येथे आज पहाटे ५:४० वाजता फिरायला गेलेल्या दोघांना टेम्पोने उडवले. यात पोपट विठ्ठल वाळूंज (वय४४, रा.मूळ वासुंदे) यांचा जगीच मृत्यु झाला. ते खासगी स्कुल बसवर चालक होते, तर गंभीर जखमी बबन रखमा ढूस (वय ६५, रा.टाकळी ढोकेश्वर) हे निवृत्त शिक्षक असून त्यांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. 

पोपट वाळूंज हे चित्रकार आबासाहेब वाळूंज यांचे लहान बंधू होते. एमएच १६ एई ६३५६ या भरधाव वेगाने नगरकडे जाणाऱ्या टेम्पोने अपंग केंद्र शाळेजवळ या दोघांना उडवले. संजय मोरे यांनी अपघाताची फिर्याद दिली आहे.

Web Title: accident at takli dhokeshwar, one deth