नगर - ट्रक व लग्झरी बस अपघातात 2 ठार, 9 जखमी

वसंत सानप
शुक्रवार, 1 जून 2018

जामखेड (नगर) : जामखेड -खर्डा रस्त्यावर शिऊर फटा येथे ट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन शिर्डीकडे निघालेल्या लग्झरीचा पहाटे 4 वाजता भिषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यु झाला. तर नऊ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले.

अपघातात मृत्यु झालेले के.मोहन रेड्डी रा.हैद्राबाद (वय 50) तर दुसरी पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती असून नाव समजू शकले नाही. इतर जखमींची नावे अनुक्रमे अशी, टी.वी.राव रा.विजयवाडा, विनोदकुमार(  वय 30), पी.अहमद (वय 50), जितेंद्र कुमार (वय 38), मधुसूदन रेड्डी ए. (वय 46), सुनीता पी. (वय 40), शेख लतीफ (वय 35),खलील गालीफ शेख (वय- 45) सर्व राहणार हैदराबाद.

हैदराबाद हून ही लगझरी शिर्डीला चालली होती तर कांदा घेऊन मालट्रक सोलापूरच्या दिशेने चालला होता.जामखेड पासून सहा किलोमीटर वळणरस्त्यावर हा अपघात पहाटे साडेचारच्या दरम्यान झाला.घटनेची माहिती जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळताच भर पाऊसात सहकार्यासह ते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी सर्व यंत्रणेचा वापर करुन जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे जखमींना तातडीने उपचार मिळू शकले.  वळण रस्तांसाठी कर्दनकाळ: जामखेड-खर्डा रस्त्यावरील या वळण रस्त्यावर यापूर्वी तुळजापूर ला ट्रक मधून पलंग घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन सहा जणांचा म्रुत्यु झाला होता.तर दुचाकीवरून नऊ जणांना जीव गमवावा लागला तर दोन डझनहून अधिक लहान मोठे अपघात झाले. येथील वळण रस्तावर दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहणांचा अंदाज चालकाला येत नाही. म्हणून अपचाताचे प्रमाण अधिक आहे. हा वळण रस्ता सरळीकरण करण्याची अवश्यक्ता असून तशी मागणीही अनेकवेळा झाली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: accident truck and luxury 2 dies and 9 injured