चालकाचा ताबा सुटल्याने थंड पेयांचा ट्रक खंबाटकी घाटात पलटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

खंडाळा (सातारा) : गोव्यावरुन पुण्याला थंड पेय घेऊन जात असताना गाडीवरचा ताबा सुटुन भरधाव वेगात जाणारा ट्रक (गाडी क्रमांक  एम-एच 12 एचः डी 7621) एस कॉर्नर  खंबाटकी घाटात पलटी झाला. माञ सुदैवाने चालक दिपक ईश्वर घुमरे (रा. अनपटवाडी ता.पाटोदा जि.बीड) वाचले.

या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असुन महामार्गाव डिझेल सांडले आहे. तसेच रस्त्यावर थंडपेय असलेल्या 'स्पिरीट'च्या बाटल्यांचा खच पडला.

यावेळी तत्काळ वाहतूक पोलीस भगवान मुठे व एएसआय जी.एस.ठाकरे व किरण शेळके यांनी वाहतूक सुरळीत केली.

Web Title: accident of truck at Khambatki Ghat due to driver lost control