esakal | अथणीचे दोन युवक अपघातात ठार : ऐन गणेशोत्सवात काळाचा घाला
sakal

बोलून बातमी शोधा

accident

अथणीचे दोन युवक अपघातात ठार : ऐन गणेशोत्सवात काळाचा घाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अथणी, रायबाग : अथणी-गोकाक मार्गावर रायबाग तालुक्यातील मुगळखोड मुख्य कालव्यानजीक कार दुभाजकावर जोरदारपणे धडकली. त्यात अथणी शहरातील दोघे युवक ठार तर एकजण जखमी झाला. शनिवारी (ता. ११) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विनायक चिदानंद

कावेरी (वय 21), मुत्तू माळी (वय 27) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची तर इरय्या हिरेमठ असे जखमीचे नाव आहे. हारुगेरी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. ऐन गणेशोत्सवात काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: लक्ष्मीच्या पावलांनी गौराईचे आगमन; घरोघरी उत्साहात स्वागत

याबाबत माहिती अशी, विनायक कावेरी व मृत्तू माळी हे हुबळीस भाडे करून स्विफ्ट डिझायर कारमधून अथणीला परत येताना हा अपघात घडला. मुत्तू व विनायक हे दोघेही अविवाहीत होते. यामध्ये गंभीर जखमी झालेला इरय्या हिरेमठ यांना हारुगेरी येथे उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. हारुगेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी, हारुगेरीचे पोलिस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत कावेरी, माळी हे श्रीराम सेनेचे कार्यकर्ते होते.

अथणी येथे शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. १२) मृत युवकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यंसस्कारास माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह श्रीराम सेनेचे सुमारे २०० कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मयत युवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली

दोघा मित्रांचा मृत्यूही एकत्र

विनायक व मुत्तू यांच्या अपघाती जाण्याने ऐन गणेशोत्सवात माळी आणि कावेरी कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांचाही मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे अंत्यविधीवेळी युवकांची संख्या मोठी होती.दोघेही नेहमी एकत्रच असत. दोघा मित्रांचा मृत्यूही एकत्र झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

loading image
go to top