कोल्हापूर : हिरण्यकेशी नदीत 100 सिलिंडर गेले वाहून (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

आजरा - येथील हिरण्यकेशीवरील पुलावर घरगुती गॅसच्या टाक्या घेऊन निघालेल्या ट्रकला अपघात झाला. यात ट्रकमध्ये भरलेल्या गॅसच्या सुमारे 100 टाक्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. 

आजरा - येथील हिरण्यकेशीवरील पुलावर घरगुती गॅसच्या टाक्या घेऊन निघालेल्या ट्रकला अपघात झाला. यात ट्रकमध्ये भरलेल्या गॅसच्या सुमारे 100 टाक्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मानसिंग आणि धनश्री देसाई यांची घरगुती गॅसची एजन्सी खेडे येथे आहे. तेथून गॅसच्या टाक्या भरून ट्रक आजऱ्याकडे येत होता. व्हिक्टोरिया पुलावर पावसामुळे निसरडे झाले आहे. यामुळे या ट्रकला अपघात झाला. ट्रकमध्ये भरलेल्या सुमारे 100  गॅसच्या टाक्या हिरण्यकेशीनदीत पडल्या. पावसामुळे नदीला पुर आला आहे. या पुराच्या पाण्यात या टाक्या वाहून गेल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on victoriya bridge in Ajara video viral