सोलापूर लोकसभा मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष कृष्णा हजारे यांचे अपघाती निधन

हुकूम मुलाणी
रविवार, 21 एप्रिल 2019

सोलापुरातील काम आटपून परत येत असताना सोलापूर लोकसभा मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष कृष्णा हजारे ब्रह्मपुरी जवळ ट्रकने दिलेल्या धडकेत ते रस्त्याच्या बाजूला पडले.

मंगळवेढा : निवडणुकीचे काम आटोपून येत असताना झालेल्या अपघातात केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांचा उपचारासाठी नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील लेंडवेचिंचाळे येथे सिध्दनाथ विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कृष्णा बाबा हजारे वय 54 यांना सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीचे काम संपल्यानंतर परत त्यांना निवडणुकीच्या कामासाठी सोलापूर येथे बोलावण्यात आले होते. काल दुपारी वाढेगाव ता सांगोला येथील घरातून सोलापूरला मोटरसायकल वर गेले होते. सोलापुरातील काम आटपून परत येत असताना ब्रह्मपुरी जवळ ट्रकने दिलेल्या धडकेत ते रस्त्याच्या बाजूला पडले. त्यांना उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु पुढील उपचारासाठी मिरज येथे नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर लेंडवे चिंचाळे येथील शिक्षकासह विद्यार्थ्यांमध्ये अपघाताचे वृत्त समजताच शोककळा पसरले असून त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: An accidental death of Solapur Lok Sabha polling center chief Krishna Baba Hazare