'अपघातांच्या ठिकाणांवर कायम स्वरूपी उपाययोजना कराव्यात'

सचिन शिंदे
बुधवार, 11 एप्रिल 2018

अशा होत्या उपाय योजना
- खंडाळा येथे नवा बोगदा करण्यात यावा
- कऱ्हाडला कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पूल करावा
- सातारा येथे महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल करावा 
- वाठार येथे पादचारी पूल उभारावा 
- भुईजला पाचवड फाट्यावरील चौकात हायमास्ट बल्बची व्यवस्था करावी
- शिरवळलाही मोठ्या प्रकाशाची व्यवस्था करावी 
- उंब्रज येथे महामार्गावरील एसटी थांबा बंद करावा
- धोकादायक वळांणांवर फ्लेक्स लावावेत  
- सातारकडून शेंद्रेकडे येणाऱ्या वाहानंचा वेग मर्यादीत ठेवावा. 
​- वेगवान वाहनांवर कारवाईसाठी कऱ्हाड व भुईज येथील महामार्ग पोलिसांकडे अद्ययावत यंत्रणा द्यावी

कऱ्हाड : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील 48 वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणांवर कायम स्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी शिफारस जिल्हा पोलिस दलाने रस्ते विकास महामंडळाला केली आहे. मात्र त्या शिफारशी करून दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे, तरी अद्यापही रस्ते विकास महामंडळ त्याच्य़ावर अभ्यासच करत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येसह भविष्यातील पाच वर्षात होणाऱ्या अडचणी लक्षात घेवून पोलिसांनी अपघातग्रस्त ठिकाणनिहाय उपाय योजना सुचवल्या होत्या मात्र अद्यापही त्यावर काहाही पर्याय होवू झालेला नाही. 

खंडाळा येथे नवीन बोगद्याला तत्वतः परवानगी मिळल्याखेरीज अन्य कोणत्याच उपाय योजना रस्ते विकास महामंडाळाने जिल्ह्यातील अपघाग्रस्त ठिकाणांवर राबवलेल्या नाहीत. दोन वर्षापूर्वी जिल्हा पोलिस, रस्ते विकास महामंडळ व महामार्गावरील पोलिस यांच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यात फिरून त्याची पहाणी केली होती. कऱ्हाड तालुक्याच्या वाठारपासून ते शिरवळपर्यंतची पहाणी झाली होती. त्यात संयुक्त पथकाने अपघाताची गंभीर अशी जिल्ह्यातील 48 ठिकाणांची नोंद करून घेतली होती.

त्या अपघातग्रस्त ठिकाणांचा अंतिम अहवाल उपाय योजनांसह पोलिसांनी रस्ते विकास महामंडलाकडे दिला होता. त्याला दोन वर्षाचा कालवधी लोटला आहे. मात्र अद्यापही रस्ते विकास महामनाडंळाने ठोस उपाय योजना काहीच हाती घेतलेल्या नाहीत. महामार्गावारील गाव आल्यानंतर वाहनधारकाला कळावे, यासाठी पट्ट्या ओढण्यात आल्या, काही ठिकाणी फलक लावण्यात आले. मात्र अपघात होवू नयेत, यासाठी सुचवलेल्या एकाही उपायांवर ठोस पावले उचलली गेली नाहीत. महामार्गावरील 80 किलोमीटरच्या पट्ट्यात 48 अशी ठिकाण आहेत. जेथे गंभीर अपघात होतात. अपघातच होण्याचे प्रमाण जास्त आहे, तेथे सर्वप्रथम उपाययोजना राबवण्याची शिफारस पोलिसांनी केली होती. त्या शिफारसीला दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही रस्ते विकास महामार्ग महामंडळासह शासकीय पातळीवर त्याच्या काहीच उपाय योजना राबवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढच होताना दिसते आहे. ठोस उपाय शोधून काढण्यासाठी झालेल्या हालाची म्हणजे केवळ कागदोपत्री घोडी नाचवल्यासारखाच प्रकार झाला आहे. 

अशा होत्या उपाय योजना
- खंडाळा येथे नवा बोगदा करण्यात यावा
- कऱ्हाडला कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पूल करावा
- सातारा येथे महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल करावा 
- वाठार येथे पादचारी पूल उभारावा 
- भुईजला पाचवड फाट्यावरील चौकात हायमास्ट बल्बची व्यवस्था करावी
- शिरवळलाही मोठ्या प्रकाशाची व्यवस्था करावी 
- उंब्रज येथे महामार्गावरील एसटी थांबा बंद करावा
- धोकादायक वळांणांवर फ्लेक्स लावावेत  
- सातारकडून शेंद्रेकडे येणाऱ्या वाहानंचा वेग मर्यादीत ठेवावा. 
- वेगवान वाहनांवर कारवाईसाठी कऱ्हाड व भुईज येथील महामार्ग पोलिसांकडे अद्ययावत यंत्रणा द्यावी

Web Title: accidents on highway in karhad