कुभेजफाटा येथे अपघात; पत्नी ठार, पती बचावला 

Accidents at Kubajfata Wife killed, husband rescued
Accidents at Kubajfata Wife killed, husband rescued

करमाळा (सोलापूर) : पत्नीच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन बंगळूर येथे परत जात असताना करमाळा - टेंभूर्णी रस्त्यावर कुंभेज फाटा (ता.करमाळा) येथे चारचाकी गाडी पुलावरून 75 फुट खोल कॅनॉलमध्ये पडल्याने पत्नी स्वाती साईकुमार रेड्डी जक्का (वय 28, रा.मुंबई) या ठार झाल्या, तर पती साईकुमार रेड्डी जक्का (वय 29, एमजी रोड, गोरेगाव वेस्ट, मुंबई सध्या रा. बंगळूर) हे जखमी झाले आहेत. तर, मृत स्वाती रेड्डीच्या डोक्‍याला व छातीला मार लागल्याने जागीच ठार झाल्या आहेत. यांचा 2019 मध्ये विवाह झाला होता. 

गाडीचा अपघात होताच ईयर बॅग उघडल्याने पतीचा जीव वाचला आहे. मात्र, पत्नी ठार झाली. अपघातात झालेले गाडीचा जीजे 27 बीई 7165 हा क्रमांक आहे. ही घटना मंगळवारी रत्री सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गाडी गुजरातहून सोलापूरकडे निघाली होती. याच ठिकाणी गेल्यावर्षी जळगाव येथील बोलेरो गाडी कॅनॉलमध्ये पडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होतो. करमाळा - टेंभूर्णी रस्त्याच्या काम रखडलेल्याने आतापर्यंत 170 हून अधिक जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. 
अपघात घडताच येथील हॉटेल चालक दादासाहेब चौगुले, अनिल कादगे, मारूती निमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन कॉनालमध्ये पडलेल्या गाडीतील दोघांना बाहेर काढले. त्यानंतर जखमी व मयत दोघांही उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे हलवण्यात आले. 

खड्‌डा चुकवीतान उड्डाणपुलावरून पिकअप उलटली 
मोडनिंब : सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंब येथील उड्डाणपुलावर खड्डा चुकवीतान झोल बसल्यामुळे पिकअप गाडी उलटली. या घटनेत चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. ही घटना आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसीतून रबर भरून ही पिकअप टेंभुर्णीकडे निघाली होती. मोडनिंबच्या उड्डाणपुलाच्या उतारावरून ही गाडी जात असताना खड्ड्याचा झोल बसल्याने सुमारे वीस मीटर अंतरावर जाऊन पलटी झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक एकनाथ कुठे (वय 44, रा. वेणेगाव, ता. माढा) हे किरकोळ जखमी झाले आहेत. ही गाडी पलटी होताच सुदैवाने मागून कोणतेही वाहन आले नाही. उड्डाणपुलावर असलेल्या खड्ड्यामुळेच ही घटना घडली. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रामेश्वर पवार हे पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. क्रेनच्या साह्याने पिकअप उड्डाण पुलाच्या बाजूला काढण्यात आली. 

कोट 
सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ मोडनिंब, अरण, वरवडे, वेणेगाव,टेंभुर्णी येथील उड्डाण पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वरवडे येथील पुलावर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. तर शेकडो खड्डे तयार झाले आहेत. परिणामी वाहन चालवणे अत्यंत धोकादायक झाले आहे. मोडनिंब येथील उड्डाणपुलाच्या खड्ड्याचा झोल बसल्याने माझी पिकअप पलटी झाली. महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे आहे. 
- एकनाथ कुटे, चालक, पिकअप वेणेगाव, माढा. 
महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com