अनुदानाची रक्क्म शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

राजेंद्र सावंत 
सोमवार, 9 जुलै 2018

पाथर्डी- तालुक्यातील सहासष्ठ गावातील अकरा हजार दोनशे बत्तीस शेतकरी बोंडअळीने बाधीत होते. यामुळे खराब झालेल्या कापसाच्या अनुदानाचे पाच कोटी अठरा लाख व अठ्ठावन्न हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाची रक्कम महसुल विभागाने शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. मागील वर्षी पाऊस उशीरा पडला होता. त्यामुळे कपाशीला बोंडअळीने पोखरल्याने मोठे नुकसान सोसावे लागले होते. कपाशीचे उत्पन्न घटल्याने व भाव नसल्याने कापुस उत्पादक आर्थिक संकटात सापडले होते. 

शासनाकडे मागणी केल्यानंतर व आमदार मोनिका राजळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतक-यांना बोंडअळीचे नुकसान भरपाईचे अनुदान मिळावे अशी मागणी केली होती. सरकारने पहील्या टप्यात पाच कोटी अठरा लाख व अठ्ठावन्न हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाची रक्कम दिली होती. ती रक्कम तालुक्यातील सहासष्ठ गावातील अकरा हजार दोनशे बत्तीस शेतक-यांच्या बँक खात्यावर महसुल प्रशासनाने जमा केली आहे. दुस-या टप्यात अनुदानाची रक्कम मिळताच राहीलेल्या शेतक-यांना अनुदान देण्यात येणार आहे.

शेतक-य़ांना पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करता यावेत यासाठी आलेले अनुदान तातडीने वाटप केले आहे. पुढील टप्यात अनुदान मिळताच ते शेतक-यांच्या खात्यामधे जमा केले जाईल
- नामदेव पाटील तहसीलदार पाथर्डी. 

पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील कापुस उत्पादकांना बोंडअळीचे अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे मी आग्रह धरला होता. राहीलेल्या शेतक-यांना तातडजीने अनुदानाची रक्कम देण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे.शेतक-यांना अडचणीच्या काळात मदत करणे सरकाचे कर्तव्यच आहे ते केले आहे.
-मोनिका राजळे आमदार शेवगाव

Web Title: Accumulation of subsidy on farmers' accounts