'आरोपीच अंगावर धावून आला'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

सोलापूर - परवानगीविना कार्यालयात येऊन दमदाटी व अरेरावीची भाषा वापरली, शासकीय कामात अडथळा आणला, मनपा प्रशासन अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यास तुम्ही टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विनायक अशोक गायकवाड (वय 40) हा खुर्ची घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आल्याची फिर्याद जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे.

शिक्षणाधिकारी राठोड, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, मंगळवेढ्याचे नकाते यांच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींनी शिक्षणाधिकारी कार्यालयात मारहाण केल्याची फिर्याद गायकवाड याने दिली होती. या फिर्यादीवरून सदस्य माने, नकाते व शिक्षणाधिकारी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांनी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड याने शिवीगाळ व दमदाटी करत सदस्य व इतरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही शिक्षणाधिकारी राठोड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: accused crime