नगर - आरोपी गुंजाळ खुनाची रोज वेगळी कारणं सांगतो

murder
murder

नगर : "शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची शनिवारी (ता. 7) हत्या झाल्यानंतर पोलिसांना शरण आलेला आरोपी संदीप गुंजाळ खुनाच्या घटनेसंदर्भात रोज वेगळी कारणे सांगत आहे. त्यातून तपासी यंत्रणेची दिशाभूल करण्याचे काम त्याच्याकडून सुरू आहे. मात्र, तपासी पोलिस यंत्रणा खुनाच्या मुळाशी पोचली असून, लवकरच संपूर्ण घटनेचा उलगडा होईल.

पोलिस यंत्रणेवर या तपासकामात कोणाचाही दबाव नाही. तणाव मात्र आहे. त्यातही कोणाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल होणार नाहीत किंवा कोणाच्या सांगण्यावरून गुन्ह्यातून कोणाला वगळण्यातही येणार नाही,'' असे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. 

सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व अक्षय शिंदे, एसआयटीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार आदी या वेळी उपस्थित होते. शर्मा यांनी शनिवारपासून आजपर्यंत झालेल्या सर्वच घटनांचा आढावा घेतला. ""केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी अद्यापपर्यंत एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध झालेला नाही, तसेच गुन्ह्याचे निश्‍चित कारणही समोर आलेले नाही. मात्र, तपासी यंत्रणेला अपेक्षित धागेदोरे मिळालेले आहेत,'' असे ते म्हणाले. 

"केडगाव घटनेशी निगडित तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात खून प्रकरणाशी निगडित घटनेत आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 34 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, खुनाच्या घटनेनंतर केडगाव भागात "रास्ता रोको', दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सहाशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात अजून कोणाला अटक नाही. मात्र, त्याचीही खातरजमा करून आरोपींना अटक करण्यात येईल,'' असे ते म्हणाले. 

"कोणत्याही राजकीय, सामाजिक, सोशल मीडियाच्या दबावाला बळी न पडता घटनेचा सखोल तपास केला जाईल. त्यातही केडगाव दंगल प्रकरणात ठोस पुरावे असल्यास कोणाचीही गय करणार नाही. ठोस पुरावे असल्याशिवाय मात्र कोणालाही अटक होणार नाही. सोशल मीडियातील अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये किंवा त्याआधारे बातम्या प्रकाशित होऊ नयेत,'' असे आवाहन शर्मा यांनी केले. 

"खुनाच्या घटनेत किमान चार ते पाच आरोपींचा समावेश असावा. त्यातील एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. तपासकामात प्रगती आहे,'' असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com