संदीप वराळ खून खटल्यातील आरोपी स्वप्निल रसाळ याला अटक

pune.jpg
pune.jpg

पारनेर : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ गाजलेल्या हत्याकांडातील  दोन वर्षांपासून पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी स्वप्नील धोंडीभाऊ रसाळ यास आज पारनेर पोलिसांनी अटक केली.

निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. यातील प्रमुख सूत्रधार व कुख्यात गुंड प्रवीण रसाळ याच्या सह  सुमारे  बारा ते चौदा जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. यातील स्वप्नील रसाळ अद्यापही फरार होता. स्वप्नील हा निघोज परिसरात रसळवाडी  येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस ठाण्याचे पथकाचे अरविंद भिंगारदिवे, विनोद बोरगे, शिवाजी कावडे यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

या गुन्हयातील आणखी एक आरोपी व पंचायत समितीचे माजी उपसभापती खंडू भूकन हा ही अद्याप दोन वर्षापासून फरार आहे पोलिसांना अद्यापही तो ही सापडला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com