मोहोळ - अल्पवयीन मुलांच्या वीस पालकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर) : अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांच्या विरोधात मोहोळ पोलीसांनी कारवाईची मोहिम सुरू केली असुन एकुण वीस पालकांवर कारवाई केली आहे. दहा जणांच्या केसेस आज (ता. 19) मोहोळ येथील न्यायालयात पाठविल्या असता न्यायालयाने प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे पालकांची भंबेरी उडाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली. 

मोहोळ शहरासह तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे अनेक पालक आपल्या चौदा ते सोळा वयोगटातील मुलाच्या हातात दुचाकी देतात. मुलांना वाहतुकीचे नियम माहिती नसल्याने ते सुसाट वाहन चालवितात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तर अपघातात मोठी अर्थीक व शारीरीक हानी मोठ्या प्रमाणात होते. 

हाच धागा धरुन मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी या विरोधात पोलिस उपनिरीक्षक विष्णु गायकवाड यांच्या देखरेखी खाली एक पथक नेमुन कारवाईची मोहीम उघडली आहे. वाहतुक शाखेचे हवालदार सचिन गलांडे दिपक घोरपडे सतिश पवार नवनाथ हजारे यांनी शिवाजी चौक कुरूल रोड गरड महाविद्यालय आदी ठिकाणी कारवाई सुरू करून विस पालकाविरोधात केसेस केल्या आहेत त्यातील दहा जणांना आज मोहोळ येथील न्यायालयाने प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला आहे.

पोलीसांनी उघडलेली मोहीम योग्य आहे. मला जरी दंड झाला असला तरी मुलाच्या भविष्यासाठी ही कारवाई योग्य आहे मी समाधानी आहे, असे मत एका मुलाचे पालक शशीकांत माने यांनी व्यक्त केले.

Web Title: action on 20 parents who gives 2 wheeler to their minor children